उपक्रम
-
- January 1, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Commentsसामाजिक जाणीव – संगोपिता केअर अॅण्ड शेल्टर या सेवाभावी संस्थेला मराठा मंडळाची भेट.
रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी *संगोपिता केअर अॅण्ड शेल्टर* येथे घालवलेला दिवस अविस्मरणीय ठरला. आश्रमातील हृदयस्पर्शी वातावरण, तेथील दिव्यांग आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे क्षण हे सर्व अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे. या उपक्रमात आम्ही २२ जण सहभागी झालो आणि सर्वांच्या पाठिंब्यामुळे जीवनावश्यक साहित्य आश्रमाला देण्याचे सेवा कार्य आम्हाला साध्य झाले. यावेळी मंडळाच्या सुमारे
-
- January 1, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
निरोगी जीवनशैली- तृणधान्यांचा आहारात समावेश:
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई येथे काल *“निरोगी मुलुंड”* या उपक्रमांतर्गत तृणधान्यांचे आपल्या जीवनशैलीतील महत्त्व तसेच जीवनशैलीजन्य आजारांवर तृणधान्यांची भूमिका या विषयावर एक अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात डॉ. नितीन पाटणकर, डॉ. रुचिता राणे, वैद्य अश्विन सावंत आणि डॉ. होस्कोटे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने उपस्थितांना तृणधान्यांचे महत्त्व नव्याने समजावून सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात तृणधान्य/millets
-
- October 27, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
दिवाळी पहाट २०२५
दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी “दिवाळी पहाट ” निमित्त मराठा मंडळ आयोजित महाराष्ट्रातील लोककलेचे विविध रंग उधळणारी, शाहीर श्री. मधुकर खामकर यांची संकल्पना व लेखणीतून सादर झालेली “शाहिरी दिवाळी” मोठ्या दिमाखात साजरी झाली. गणेश वंदनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला.वासुदेव,गवळण,गोंधळ, शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरील जन्म, संत रामदास यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक, शेतकऱ्यांचे बैलजोडीवरील गाणं,जेजुरी- खंडोबा- मुरळी नृत्य, जांभुळ
-
- October 14, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
*मराठा मंडळ मुलुंड,मुंबई या आपल्या संस्थेचा ४७ वा वर्धापन दिन – एक भक्तिमय आणि प्रेरणादायी अनुभूती!*
सोमवार दि. ०६ ऑक्टोबर २०२५, कोजागिरी पौर्णिमेच्या पावन दिवशी, *मराठा मंडळाचा ४७ वा वर्धापन दिन समारंभ* अत्यंत भक्तिभावाने आणि प्रेरणादायी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी मंडळात दोन भावस्पर्शी सत्रं पार पडली. एक सकाळी भावभक्तीचे आणि दुसरं संध्याकाळी कला, श्रद्धा आणि प्रेरणेचं दर्शन घडवणारं. सकाळच्या सत्राची सुरुवात *श्री सत्यनारायण महापूजेने* झाली. श्रद्धा, भक्तीने परिपूर्ण
-
- August 15, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
१२७ वी आचार्य अत्रे जयंती
आचार्य अत्रे हे विडंबनकार, हे कवी, राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, कादंबरीकार, नाटककार, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. मराठी रंगभूमीला उतरती कळा लागली, त्यावेळी तिला सावरण्याचे आणि पुनश्च प्रेक्षकांमध्ये रस निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले,’ असे गौरवोद्गार साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले. आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती, मुलुंड आणि ‘आत्रेय’
-
- July 27, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
रिमझिम कवितांची
रिमझिम कवितांची ...............! . काल २६ जुलै २०२५, रोजी संध्याकाळी बाहेर पाऊस बरसत होता आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई इथे सरस्वती वाचनालय आयोजित "कवितांची रिमझिम" आपल्याला चिंब भिजवत होती. अनंत जोशी, सुप्रिया हळबे, सतीश सोलांकुरकर, साहेबराव ठाणगे असे कवी, कवयित्री त्यात सामील झाले होते. . अनंत जोशी हे बँक ऑफ महाराष्ट्र मधून निवृत्त झाले आहेत -
- June 14, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी शिबिर
*मराठा मंडळ मुलुंड आणि डिग्निटी फाउंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने *सोमवार, ९ जून २०२५ ते शुक्रवार १३ जून २०२५* पर्यंत मराठा मंडळात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या फिरत्या दवाखान्यात संधीवात, गुडघेदुखी, मानदुखी, टाचदुखी, कोपरादुखी, अर्धांगवायू, पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी यासारख्या विविध समस्यांवर उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले. *PRO भारत मोकल, फिजिओथेरपीस्ट -
- June 9, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांवर आधारित डॉ. संगीता रावदेव यांच्या श्रवणीय व्याख्यान
मंगळावर दिनांक १३ मे २०२५ रोजी आपल्या मराठा मंडळाच्या व फोर्टिस हाॅस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित प़ामुख्याने महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांवर आधारित डॉ. संगीता रावदेव यांच्या श्रवणीय व्याख्यानाचा उत्तम वृत्तांत, त्याचे शब्दांकन यामुळे सदर कार्यक्रम नजरेसमोर उभा राहिला! मंडळाने आरोग्य विषयक खरोखरच अप्रतिम कार्यक्रम सादर केला. मंडळाच्या *ज्येष्ठ नागरिक समन्वय व आरोग्य विभाग*
-
- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
पुनर्विकास कार्यशाळा : मुलुंड मधील गृहनिर्माण सोसायट्यांना जाहीर आवाहन
मराठा मंडळ, मुलुंड यांच्या वतीने आयोजित “गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांसाठी कार्यशाळा” या विशेष उपक्रमात, पुनर्विकास, स्वयंविकास आणि संपूर्ण प्रक्रिया याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहकार क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ Advocate श्रीप्रसाद परब यांनी कायदेशीर बाबी, विकासकांशी होणारे वाद कसे टाळावेत, तसेच प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ कशी ठेवावी यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या सहज शैलीत त्यांनी उपस्थितांच्या अनेक शंका
-
- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
नवं वर्ष स्वागत यात्रा – मराठा मंडळाचा उस्फुर्त सहभाग
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुलुंडमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा दिवस नववर्ष दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करताना, आधुनिक विचारांशी सांगड घालून भारताला सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून घडविण्याच्या उद्देशाने समाजात एकता निर्माण व्हावी, या हेतूने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३० मार्च २०२५ रोजी आयोजित या स्वागत यात्रेत मराठा
