वाचनालय – अभ्यासिका विभाग

आपल्या मंडळाच्या विद्यमाने सभासदांची वाचन अभिरुची जोपासावी तसेच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अवांतर वाचन साहित्य उपलब्ध व्हावे, ज्येष्ठ नागरिकांना पुस्तकांबरोबरच दैनंदिन वृत्तपत्रे निवांतपणे चाळता यावीत यासाठी, त्याच बरोबर शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सरस्वती वाचनालय व अभ्यासिका सुरु केली आहे. त्याचा लाभ सर्व इच्छुक नागरिक व विद्यार्थी घेत आहेत.
हे वाचनालय तमाम मुलुंड वासियांसाठी खुले आहे.
वाचनालयाची वेळः
सोमवार ते शनिवार सायंकाळी ५ ते ७.३० रविवार फक्त सकाळी १०.३० ते दुपारी १.००
प्रवेश फी रु.५/-, मासिक फी रु. ३०/-, वार्षिक फी रु. ३००/- व अनामत रु. २००/-.
मंडळाच्या सभासदांसाठी फक्त प्रवेश फी रु. ५/- व अनामत रु. २००/-
अभ्यासिका वेळ :- सोमवार ते रविवार दररोज सकाळी ९ ते रात्रौ ९
प्रवेश शुल्क रु. ५/- मासिक फी रु. १००/- अनामत रु. १००/-
ही अभ्यासिका मुलुंडमधील सर्व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.

दिवाळी अंक योजना

या योजनेअंतर्गत प्रतीवर्षी सभासदांना दर्जेदार दिवाळी अंक व त्यासोबत एक कालनिर्णय दिनदर्शिका फक्त रु. १००/- वर्गणीमध्ये दिले जातात. या वाचनालयाच्या वतीने
१) ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन
२) निबंधस्पर्धा
३) काव्य वाचन
४) ऐतिहासिक / शैक्षणिक सहली
५) मुलुंडमधील अन्य साहित्यिक उपक्रम व कार्यक्रमात सहभाग इ. उपक्रम राबविले जातात.