ब्लॉग
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Commentsमागे वळून पाहतांना…! सौ.विजया साटम.
कशी आणि कुठुकन सुरुवात करावी हे कळत नाहीय. मनुष्य जन्माला येतो त्या वेळी नियतीने नशीब ठरविलेले असते असे म्हणतात. पण कसे जगायचं आणि वागायचे हे थोरा मोठ्यांच्या संस्कारातुन घडायचं असते. आजी आजोबा, आई वडील यांचे आशिर्वाद आणि संस्कार मोलाचे असतात. असो! माझा जन्म कोकणात झाला. आम्ही सहा भांवडं. माझा नंबर चार. माझे वडील पोष्ट ऑफीस
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहाताना…! सौ. मनीषा सावंत.
१९८६ ची गोष्ट. मी जे.जे इस्पीतळात कक्ष क्रमांक ९ मधे कार्यरत होते. एके दिवशी रात्री २ वा. ३ वर्ष वयाच्या मुलीला घेऊन एक व्यक्ती धावतपळत आली.तिचं नाव कविता. त्यांच्या बरोबर अजून १०-१२ जणं आले होते. खूप सुंदर आणि गोड अशी मुलगी. पाणी मागत होती पण पाणी दिले की अतिशय घाबरत होती. याला हाय ड्रोफोबिया म्हणजे
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहताना…..! सौ.अंजली प्रभाकर पार्टे
दिपावलीच्या सायंकाळची वेळ !! कानावर भाऊबीजेचं गाणं पडलं “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,ओवाळीते भाऊराया,वेड्या बहिणी ची वेडी ही माया,” चटकन लहानपणीची आठवण आली. दुपारीच्या जेवणाचा थाट आगळा वेगळा असायचा.तिन्ही भाऊ पाटावर बसायचे, मी पाटाभोवती सुंदर रांगोळी काढत असे. आईची नवीन साडी नेसता येत नसली तरी गुंडाळायचे व आईचे दागिने घालायचे. साडी सावरत हातात आरतीचे ताट घेऊन भावांना
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहताना…! चित्रलेखा शिंदे
मागे वळून पाहताना वाटते ते दिवस चांगले होते, जीवनाच्या प्रत्येक झाडावर आठवणींचे खोपे टांगले होते. मनाचा वेग कोणीच मोजू शकत नाही जसा झोका पुढे जाण्याआधी मागे गेल्यावरच म्हणजे भूतकाळात त्याला गती मिळते व तो भविष्याकडे झेपावतो व नंतर वर्तमानात स्थिर होतं तसेच मनाचे आहे. . आमच्या पिढीने समाजात होणारा मोठा बदल पाहिला आहे व त्याबरोबर
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहतांना …..! सौ. शिल्पा नलावडे
माझ्या आयुष्याचे पुस्तक, निम्म्याहून जास्त वाचून , अनुभवून झालं.अजून काही पुढचे भाग आहेत वाचायचे . पुढच्या भागात काय आहे माहित नाही पण मागचे मात्र सगळे भाग कसे स्वच्छ ,स्पष्ट आहेत ..लख्ख प्रकाशा सारखे. आजही पुढचा मार्ग दाखवायला एकदम समर्थ.आपले विश्व म्हणजे आपले घर ,कुटुंब, नोकरी आणि परत घर या मध्येच असतं.कुटुंब म्हणजे लग्नाआधी माहेर आणि
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहतांना….! साै. शाेभा वि. सावंत
जरा विसावू या वळणावर……..या वळणावर! . आज मी वयाच्या सत्तरीच्या जवळ आलेली माझ्या नातवंडांची आजी आहे. मी नातवंडांबराेबर असताना त्यांना बघून मला माझ्या बालपणाच्या गोष्टी आठवतात. . माझे बालपण लालबाग मधील इमारतीत गेले. त्यावेळी आम्ही शेजारी मुले मुली एकत्र खेळायचाे, अभ्यास करायचो, तसेच भांडायचो, पण भांडण विसरुन पुन्हा एकत्र यायचाे. सार्वजनिक गणपती बघायला, राणीच्या बागेत
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहतांना…! सौ.नागरत्ना सावंत.
आपल्या महिला आघाडीच्या, आताच्या ल़ेखमालेचा विषय मी वाचला ,आणि हा विषय मनाला खुपच भावला, आवडला. खरंच आपल्या आयुष्यातील गतकाळातील आठवणींचा,सुख दुःखांचा खजिना आज आपल्याला या निमित्ताने मोकळा करायची संधी महिला आघाडीने दिली ,त्याबद्दल धन्यवाद!. हा विषय वाचताच मी माझ्या आयुष्यात मागे डोकावून पाहिले,तर जणु काही एखाद्या चलतचित्रा प्रमाणे मी माझ्या बालपणात गेले. माझे बालपण
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहताना…..! सौ. विनिता दरेकर
ऋणानुबंध . ” वहिनी,निघते ग …….आई गेली!” प्रियाचे शब्द कानी पडले आणि मी जिथल्या तिथेच थिजून गेले.काहीच बोलू शकले नाही.सर्रकन तेहतीस वर्षाचा काळ मागे गेले. . सासरी उंबरठ्यावर चे माप ओलांडून आले आणि अगदी जीवापाड प्रेम करणारी ताईमावशी बापू, माई मावशी,अण्णा मामा,केरकर आई अण्णा, लीला आत्या,किती किती नाती मिळाली.एक एक करून
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहतांना… : *सौ. मीनल सावंत*
गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर चालत चालत अगदी एका टोकाला आल्यावर खूप दूर आल्याची जाणीव झाली आणि तिथल्या एका दगडावर जरा टेकले. सुर्य समुद्रात गडप होण्याच्या तयारीत होता आणि मला जसा लहानपणी दिसायचा तसाच दिसला. तेव्हा वाटायचं हा पाण्यात जाऊन लपतो आणि सकाळी परत दुसऱ्या दिशेने वर येतो. आज इतक्या वर्षात त्याच्या दिनचर्येत काहीच बदल झालेला नाही.
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*मागे वळून पाहतांना…* : *सौ.शिल्पा लाड*
खरंच किती समाधान वाटत आहे! सतत ऊर्जा घेऊन…वयाचा विचार न करता…म्हणजे सर्व गोष्टी एका पाठोपाठ चित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोरून सरकत आहेत. प्रथम माझे रम्य ते बालपण निसर्गरम्य अशा गगनबावडा शेजारील भुईबावडा गावी इयत्ता चौथी पर्यन्त गेल्यामुळे व एकत्र कुटुंबात असल्यामुळे चांगले संस्कार होत होते. परंतु शिक्षणाची आवड असल्यामुळे आईवडिलांचे प्रेम,आपुलकी बाजूला ठेवून, भविष्य घडविण्यासाठी माझे भाऊ मला
