- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Comments
मंडळाच्या वार्षिक परंपरेनुसार बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय भावना जागविण्याची परंपरा मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेने कायम राखली.
या वर्षीचे प्रमुख आकर्षण होते श्री. विशाल कवीश्वर यांचे “शिवचरित्र” या विषयावरील ओघवते व्याख्यान. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा थरारक इतिहास आणि प्रेरणादायी जीवनप्रवास अत्यंत प्रभावी शैलीत सादर केला. श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.
कार्यक्रमानंतर अनेकांनी मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. व्यासपिठावरील शिवप्रतिमा सजावट आणि सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी साकारलेली प्रवेशद्वारावरील “जगदंब” रांगोळी लक्ष वेधून घेणारी होती.
