विवाह पवित्र बंधन, दोन परिवाराचे नवे संबंध जुळतात व सामाजिक बांधिलकी जपली जाते.
आपल्या समाजातील मुलामुलींचा परिचय व्हावा व त्यांच्या पालकांचे परिश्रम काही प्रमाणात कमी व्हावेत
या सदिच्छेने प्रेरित होऊन मंडळाच्या वधुवर सूचक मंडळाने गेली तेरा वर्षे आयोजित केलेल्या मेळाव्यांना उत्तम प्रतिसाद लाभला.
त्यामुळे या वर्षीही वधुवर, पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
मेळावा: रविवार दि. २२ नोव्हेंबर, २०२६
वेळ : सकाळी ९:०० ते दुपारी १:००
स्थळ : मराठामंडळ मुलुंड, मुंबई, सांस्कृतिक केंद्र इमारत, चंद्रकांत गणपतराव देसाई सभागृह,
वा. ब. फडके मार्ग. कै. वसंतराव सकपाळ चौक, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१.
नोंदणी कालावधी :- दिनांक ०१ / ११ / २०२६ ते २१ / ११ / २०२६ पर्यंत
वेळ:-सकाळी ११:०० ते सायंकाळी ८:००
नोंदणी शुल्क रु ६००/- (जिएसटी सह ) (प्रत्येक वधूवरांसाठी )
ऑन लाईन नोंदणी संकेत स्थळ: नोंदणी करा / Register Here
कृपया त्वरित ऑनलाईन नोंदणी चे तपशील [स्क्रीन शॉर्ट], संपूर्ण नाव या सहित अधिकृत भ्रमण ध्वनी क्रमांक [मोबाइल नंबर ] ७०४५०२२०९६ येथे पाठवावे .
मराठा मंडळ मुलुंड मुंबई
संचालित
वधु वर समिती