कुमार व श्रद्धा सोहोनी यांचा *सखेसोबती* एक सांस्कृतिक मेजवानी. एक अविस्मरणीय अनुभूती.

*दिनांक* : रविवार १४ जून २०२६
​ *वेळ* : दुपारी ४ वाजता
​ *ठिकाण* : मराठा मंडळ मुलुंड
९० फुटी मार्ग, मुलुंड (पूर्व)

मराठा मंडळ मुलुंड व अ भा म नाट्य परिषद, मुलुंड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी यांच्या प्रदीर्घ प्रवासावर आधारित ‘सखेसोबती’ हा विशेष कार्यक्रम सादर झाला.

कुमार सोहोनी गेली ६५ वर्षे कलाक्षेत्रात सक्रिय असून, गेली ५३ वर्षे ते दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत ८८ नाटके, १८ सिनेमे, १२ मालिका आणि ८ टेलिफिल्म्स दिग्दर्शित केल्या आहेत. त्यांनी जवळपास ३५० ते ४०० दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

मराठा मंडळ -मुलुंड व अ.भा.म.नाट्य परिषद मुलुंड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ *सखे सोबती’* हा कार्यक्रम केवळ एक सादरीकरण नसून, ती रसिकांसाठी एक वैचारिक आणि भावनिक पर्वणीच ठरली!मराठा मंडळ असे अनेक कार्यक्रम उपक्रम सादर करीत असते. त्यातून समाजासाठी आणि समाजाने सकारात्मक बोध घ्यावा व समाजाला फायदा व्हावा, ही भावना असते.​तसाच आजचा हा कार्यक्रम होता.सिनेमा आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक दिग्गज नाव, ज्यांनी आपल्या कसदार लेखणीने आणि प्रभावी दिग्दर्शनाने अनेक कलाकृती अजरामर केल्या, ते ज्येष्ठ निर्माते, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते श्री. कुमार सोहनी सरांच्या आयुष्याचा प्रवास अनुभवणे म्हणजे कलेच्या एका समृद्ध इतिहासाला उजाळा देण्यासारखे होते.

​तिनशेहून अधिक प्रतिभावान सुप्रसिध्द दिग्गज नट-नट्यांना घडवणारा एक ‘ गुरु’, आणि तरीही मुलुंडच्या रसिकांशी घट्ट नाळ जोडून राहणारा एक ‘साधा माणूस’—अशा या दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा प्रवास या कार्यक्रमातून अत्यंत प्रभावीपणे मांडला गेला. कुमार सोहनी सरांसारख्या थोर कलावंताची अशी उलगड झालेली ओळख, आमच्यासारख्या रसिकांच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेली.

​रसिकांच्या आवडी निवडीचा मान राखून, अशा दर्जेदार आणि अर्थपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी दिल्याबद्दल मराठा मंडळा व अ.भा.म. नाट्य परिषद च्या अध्यक्ष,सचिव व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कलेची ही जोपासना आणि सांस्कृतिक मूल्यांचा हा वारसा आपण असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत करत राहावा, हीच सदिच्छा.

*कुमार सोहनी एक बहुआयामी कलाकार*
– *निर्माते-दिग्दर्शक*: मराठी चित्रपट, नाटक, मालिका क्षेत्रात 40+ वर्षांचा अनुभव
– *लेखक*: सामाजिक विषयांवर मार्मिक लिखाण.
– *गायक-अभिनेते*: स्वतः गात, अभिनय करतात आणि निवेदनही करतात.

हा केवळ गाण्यांचा कार्यक्रम नाही. कुमार सोहनी सर जुन्या आठवणी, किस्से, गाण्यामागच्या कथा सांगत मैफल रंगवतात. पुलं, सुधीर फडके, गदिमा, शांताबाई यांच्या साहित्याला उजाळा देतात. म्हणून श्रोत्यांना तो ‘सोबती’ वाटतो.
त्यांनी दूरदर्शन वर: 80-90 च्या दशकात अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे दिग्दर्शन केले आहे.
‘तो मी नव्हेच’, ‘सूर्याची पिल्ले’ सारख्या नाटकांमुळेही प्रेक्षक त्यांना ओळखतात.
‘गदिमा गीतयात्रा’, ‘पुलोत्सव’, ‘भाई समजून घेताना’ – हे त्यांचे signature कार्यक्रम.
ते महाराष्ट्र शासन, नाट्य परिषद यांचे अनेक पुरस्कार विजेते आहेत.

कुमार सोहनी मते “कला ही फक्त मनोरंजन नाही, तर संस्कार करणारी आहे.”
*सन्माननीय श्री. कुमार सोहनी सर* यांच्या _सखे सोबती_ कार्यक्रम ऐकून ,पाहून खूप आनंद झाला. मराठा मंडळात असा दर्जेदार कार्यक्रम होणं ही अभिमानाची गोष्ट आहे