*सामुदायिक गीताई पठण*

*सामुदायिक गीताई पठण*

*दिनांक:* शुक्रवार, १२ जून २०२६
*वेळ:* सायंकाळी ५.०० वाजता
*स्थळ:* मराठा मंडळ मुलुंड,मुंबई सभागृह, दुसरा मजला

शुक्रवार दिनांक १२ जून रोजी आपल्या मराठा मंडळात संध्याकाळी ५.३० वाजता *सामुदायिक गीताई पठण* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यात्मिक क्षेत्रातील मन:शांती मिळवून देणारा हा एक आगळावेगळा कार्यक्रम मंडळाने आयोजित करुन
मंडळाचे सभासद आणि मुलुंडकर रसिकांना वेगळा आनंद मिळवून दिला!

उपस्थित प़ेक्षकानी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प़तिसाद दिला! कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी मंडळाला मनापासून धन्यवाद दिले! अशा प़कारचे प़बोधनात्मक आणि निखळ आनंद, शांती देणारे कार्यक्रम आयोजित करून मराठा मंडळाने जनमानसात आदराचे, कौतुकाचे आणि मानाचे स्थान पटकावले आहे! अशा प़तिक्रीया व्यक्त केल्या आहेत! रंगमंचावरील श्रीकृष्णाच्या मूर्तीची सजावट उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला! लक्ष्मी कॅटरर्सचे राहुल सरफरे आणि अनिल शितप यांनी उत्कृष्ट सजावट केली होती.

कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वाना सौ. रश्मी राणे यांनी प़साद दिला! मे. लक्ष्मी कॅटरर्सच्या सौ. शामल चाळके यांनी नेहमी प़माणेच अल्पोपहार – चहाची उत्तम व्यवस्था केली होती. या सामुदायिक गीताई पठणामुळे, सदर पठण चालू असताना एक प़कारचे धीरगंभीर आणि पवित्र वातावरण निर्माण झाले होते. एकसुरातील वाचनाच्या ध्वनी लहरींमुळे सभागृहात एक प़कारचे मांगल्य निर्माण झाले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनाचे सादरीकरणाचे मुख्य श्रेय आपले एक ज्येष्ठ सभासद सन्माननीय श्री. अनिल वामन सावंत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता अनिल सावंत याना द्यावे लागेल! कारण त्यांच्याच संकल्पनेतून हा कार्यक्रम घडून आला. या सावंत उभयतांबरोबरच आपल्या सांस्कृतिक समिती प्रमुख सौ. रश्मी (आशा) राणे, निमंत्रक सौ. करुणा सावंत, महिला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर,तसेच मंडळाच्या सहचिटणीस सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी व त्यांच्या बरोबर कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भालेराव, वसंत भोसले, दिगंबर राणे, कार्यकारिणी सदस्य शंकर दळवी, अजय माने व अन्य अनेक महिला सदस्य कार्यालयीन स्टाफ,
मंडळाचे कर्मचारी अशा अनेकांनी सहकार्य, सहभाग घेतला! एकूणच सर्वांच्या सहकार्याने हा सामुदायिक गीताई पठण कार्यक्रम खरोखरच अप्रतिम झाला!! या साठी मंडळाचे सर्व थरातून भरभरून कौतुक होत आहे!!

*कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने* *प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:|*

विनोबाजींनी संस्कृत गीतेला सोप्या प्राकृत मराठीत आणले, हे सर्वसामान्यांसाठी कृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यासाठी दिलेल्या दिव्यदृष्टीसारखेच वरदान आहे. अत्यंत सोप्या भाषेत गीतेचे सार सांगणे हे विनोबांसारख्या संतांनाच जमते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात जागतिक संघर्ष, संसारातील ताणतणाव आणि रोज नव्याने समोर येणाऱ्या प्रश्नांनी मनुष्य गांजून गेला आहे. त्याला मनःशांती हवी आहे. ती मिळवून देण्यासाठी अशा आध्यात्मिक आयोजनांची नितांत गरज आहे.

गीताई कार्यक्रमातील दर्दी, आध्यात्मिक रसिक श्रोत्यांची गर्दी पाहून लक्षात येते की, चहोबाजूंनी तणावाने ग्रस्त समाजाला मनःशांतीची किती तीव्र गरज आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर समोर आपलेच नातेवाईक, सगेसोयरे उभे पाहून गोंधळलेल्या, विषादग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता. कदाचित यातील काही ओव्यांचा गूढार्थ आपल्याला उमगला नसेल. *काहि हरकत नाही.* पण ज्या श्रद्धेने, भक्तिभावाने आपण हे श्रवण-पठण केले, त्याचे फलित भगवंत आपल्या जीवनातील आचरणात निश्चित उतरवील, याबद्दल संदेह नाही. आध्यात्मिक ऊर्जेतून मिळणारी मनःशांती खरोखरच पराकोटीची असते. तिचे मोल व वर्णन शब्दांत करता येणार नाही. मराठा मंडळात सादर केलेल्या विनोबांच्या ‘गीताई’च्या पठणातून अशीच काही दिव्य अनुभूती सर्व रसिक सभासद आणि प्रेक्षकांना आली असणार, यात तिळमात्र शंका नाही.