शिवजयंती उत्सव – २०२४

शिवजयंती उत्सव – २०२४

शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून, राष्ट्रीय भावना जागविण्याची परंपरा मराठा मंडळ मुलुंड,मुंबई या आपल्या संस्थेने शिवजयंती उत्सव उत्साहाने साजरा करून या ही वर्षी जपली. मंडळाच्या सभासदांच्या कलामंच विभागाने सादर केलेला साहित्य, संगीत, पोवाडा, नृत्य, नाट्य इत्यादी विविध कलाप्रकार असलेला “हे प्रभो शिवाजी राजा” हा अविस्मरणीय कार्यक्रम जोशपूर्ण झाला.

काही दिवसांच्या अथक मेहनतीने सादर केलेल्या १००% मराठमोळ्या कलाकृती लक्ष्यवेधी आणि अप्रतिम होत्या. या कलाकृतींनी प्रेक्षकांची मनं मोहित केली आणि त्यांना शिवरायांच्या पराक्रमाची आणि आदर्शांची आठवण करून दिली. त्याचबरोबर एैश्र्वर्या बिद्र यांनी प्रवेशद्वाराजवळ काढलेली “हे प्रभो शिवाजी राजा” ही रांगोळी अत्यंत सुंदर आणि मनमोहक होती.

कार्यक्रमाची रचना आणि आयोजन उत्तम होते. वेगवेगळ्या कलाप्रकारांचा समावेश असल्यामुळे कार्यक्रम कंटाळवाणा न होता मनोरंजक बनला होता.कलाकारांनी आपल्या अभिनयातून आणि नृत्यातून शिवरायांच्या जीवनातील विविध घटनांचे प्रभावी होते.वेशभूषा आणि मंचसज्जा देखील उत्कृष्ट होती. महाराज्याचा भव्य आणि दिव्य मुकुट प्रेक्षकांच्या लक्ष वेधून घेत होते. सजावटकार हेमंत भोगले यांनी महाराजांच्या मुकुटाचा आकार आणि डिझाईनही अत्यंत सुंदर आणि राजेशाही होती. त्यामुळे तो पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. मुकुट हा केवळ राजेशाहीचं प्रतीक नाही तर तो राजाच्या शक्ती आणि सामर्थ्याचंही प्रतीक आहे. मुकुट पाहून प्रेक्षकांना त्यांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या नेतृत्वाची जाणीव झाली.

*शब्दही अपुरे पडती*
*अशी शिवबांची किर्ती !*
*राजा शोभून दिसे जगती,*
*अवघ्या जगाचे शिवछत्रपती !!*

महाराजांची कीर्ती वर्णन करताना, सूत्रसंचालकांना खरोखरच शब्द अपुरे पडत होते. त्यांनी खूप सुंदर काव्यमय शब्दांतून, तर कलाकारांनी आपल्या सहज अभिवाचनातून, नाट्यातून,नृत्यातून,गाण्यातून, पोवाड्यातून महाराजांच्या कीर्तीची,पराक्रमाची, आदर्शाची तसेच मावळ्यांच्या एकनिष्ठतेची गाथा सादर केली.

यावेळच्या शिवजयंतीचा कार्यक्रम आपल्या मंडळाच्या कलाकारांनी अत्यंत देखण्या स्वरूपात सादर केला. या सर्व कलाकारांची प़चंड मेहनत, जिद्द, आणि परिश्रम यांचे मन:पूर्वक कौतुक!! हा शिवजयंती कार्यक्रम यशस्वी करणारे सर्व कलाकार, कार्यकर्ते, सांस्कृतिक व अन्य सर्व सहकारी समित्या कार्यक्रमाचे सर्व दिग्दर्शक. सुत्रसंचलन, गायक, नृत्य, रांगोळी, सर्व कलाकारांचा कलाविष्कार आणि सर्वांचा सहभाग यांनी कार्यक्रम चांगला झाला. कार्यक्रमापूर्वीची लगबग झकास होती. कार्यक्रमामधली शिवाजी महाराजांची भूमिका अप्रतिम.