मराठा मंडळाचे ४५वे स्नेह संमेलन

मंडळाचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा अतिशय देखणा आणि आटोपशीर झाला.* रामा रघुनंदना.* हा प़भू रामचंद्रांचे गुणगान करणारा गाण्यांचा कार्यक्रम खूपच छान! यातील गायक कलाकार, ध्वनी संयोजक, दिग्दर्शक,सूत्रसंचालिका या सर्वांच्या कलागुणांचे मनोज्ञ दर्शन झाले.

व्यासपीठावरील पारितोषिक वितरण आणि गुण – गौरव समारंभाचे संगिता लाड यांचे पहिल्याच प़यत्नाचे निवेदन फारच सुंदर. सोनाली कदम, आणि रूपाली शेलार यांनी पहिली वेळ असून खूप छान सुत्रसंचालन केल. मंडळाचे सरचिटणीस श्री. अजयजी खामकर यांचे समयोचित प़ास्ताविक आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाखाणण्याजोगे होते. मा. कार्याध्यक्ष श्री. महेशजी चव्हाण यांचे वक्तृत्व खरोखरच उत्तम. विषयाचे विश्लेषण, मंडळाच्या भावी वाटचालीची झलक उपस्थितांना चांगलीच भावली! प़वेशद्वारावरील चित्तवेधक रांगोळी नयनरम्य तसेच विषयाचे दर्शन घडविणारी होती.

प्रमुख पाहुणे मा.श्री.नरेंद्र वाभळे व मा.श्री.अरुण धुरी यांनी सर्व गुणवान विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त आणि प्रेरणादायक.

दोन्हीही पाहुणे उत्तम वक्ते होते. मा. डॉ. अरूण धुरी सरांचे भाषण हे केवळ विद्यार्थी वर्गासाठीच नव्हे तर पालकांसाठी सुद्धां बोधामृत होते. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, निर्भीड आणि व्यासंगी पत्रकार मा. श्री. नरेंद्र वाबळे साहेबांचे भाषण सुद्धां श्रवणीय व विचार प़वर्तक होते.या साठी सौ. प़ियांका राणे याना मन:पूर्वक धन्यवाद! एकूणच रंगमंचावरील कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, कालबद्ध आणि तितकाच देखणा होता. यावेळी सांस्कृतिक समिती प़मुख, निमंत्रक आणि त्यांचे सर्व सहकारी यानी आयोजनाबाबत केलेले नवे प्रयोग लक्षणीय होते.

कलाकार, सूत्रसंचालक, निवेदक इ. बाबत केलेली योजना खूपच छान व लक्षवेधी ठरली. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, युवा कार्यकर्ते श्री. प़साद साळवी यांनी पहिल्याच प्रयत्नात खूप छान आभार प्रदर्शन केले. एकूण आयोजनामध्ये पडद्यामागील कलाकार म्हणून सौ. रश्मी राणे, उदय दरेकर, ऐश्वर्या ब्रीद,अजय खामकर, उदय कुडतरकर, महेंद्र मोहिते, आणि त्यांचे सर्व सहकारी,नविन साऊंड सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी बहुमोल योगदान देणारे श्री. निलेशजी सुर्वे, हेमंत भोगले, सर्व गायक कलाकार, तसेच सर्व सहकारी, मंडळाची कार्यकारिणी,कार्यालयीन सेवक, कर्मचारी वर्ग या सर्वांचे मनापासून कौतुक व अभिनंदन आणि आभार सुद्धां. धन्यवाद! असेच अभेद्य ऐक्य, परस्पर आदरभाव आणि स्नेहाचे वातावरण मराठा मंडळाच्या भावी वाटचालीसाठी फारच छान आहे.

काल आपल्या मराठा मंडळाचे ४५वे स्नेह संमेलन खूपच छान संपन्न झाले, सर्वच कार्यक्रम अगदी सुरुवातीच्या प्रार्थने पासुन अगदी राष्ट्रगीता पर्यंत शिस्तबद्ध, कौतुकास्पद सोहळा झाला, मला या दोन वर्षांत आपल्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित रहाण्याचा योग आला, आपले गायक, गायिका, अगदी आत्मियतेने, या कार्यक्रमात सहभाग घेतात, व उत्स्फूर्तपणे आपली गीते सादर करतात, कालच्या कार्यक्रमातही श्री प्रभू रामाची अत्यंत सुंदर गीते सुरेल, तन्मयतेने सादर केली, कुणीही गायक व्यावसायिक गायक नसतानाही असा सुंदर गीत नजराणा सादर केला हे कौतुकास्पद आहे,,,, सर्वांचे *मनःपूर्वक अभिनंदन*

प्रमुख सौ.रश्मी राणे व निमंत्रक सौ. करुणा सावंत तसेच कलाकारांना मार्गदर्शन करून टीम कलामंच मध्ये सामील होऊन सोबत करणारे ज्येष्ठ गायक श्री.उदय कुडतरकर व श्री.महेंद्र मोहिते यांचे अभिनंदन आणि आभार. श्री.प्रसाद साळवी यांनी केलेले आभार प्रदर्शनही खूप छान झाले.