जागतिक महिला दिनानिमित्त महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्गासाठी आयोजित *स्नेहमेळावा*

रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी आपल्या मराठा मंडळाने आयोजित केलेला *स्नेह मेळावा* हा खरोखरच सर्वोत्कृष्ठ ठरला!

या मेळाव्याला लाभलेल्या प़मुख पाहुण्या छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) च्या अपर जिल्हाधिकारी सन्माननीय अंजली अभय धानोरकर यांच्या सुश्राव्य व्याख्यानाने उपस्थित श्रोतृवृंद, रसिकजन अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले! धानोरकर मॅडम यांचे ओघवत्या शैलीतील श्रवणीय व्याख्यान ऐकताना अवघे सभागृह भारावून गेले होते! सभागृहात उपस्थित जाणता रसिक प़ेक्षक खरोखरच भारावून गेला होता! अनेक जाणकार, ज्येष्ठ रसिकांनी मंडळाला भरभरून धन्यवाद दिले! मंडळाचे आभार व्यक्त केले! सर्वांच्याच प़तिक्रिया मंडळाचा लौकिक आणि आदर वाढविणाऱ्या होत्या! मराठा मंडळाचे कायम हितचिंतक, ज्येष्ठ पत्रकार मा. डॉ. सुकृत खांडेकर सर यानी तर मंडळाचे भरभरून कौतुक केले!!

या कार्यक्रमाच्या एकूण आयोजन/ नियोजनात मंडळाच्या महिला आघाडी प़मुख माधुरी ताई तळेकर व निमंत्रक मनिषा साळवी यांचा खरोखरच सिंहाचा वाटा होता! सतत १४/१५ दिवस त्यांनी आपल्या सर्व महिला आघाडी सदस्य व सहकारी यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी केला!
प़कृती अस्वास्थ्य असतानाही आपल्या मंडळाच्या सहचिटणीस सौ.ऐश्वर्या ब्रीद यांनी सांस्कृतिक समिती निमंत्रक करुणा सावंत व अन्य महिला भगिनींना बरोबर घेऊन केलेले अत्यंत नियोजनबद्ध आयोजन खरोखरच अत्युत्तमच होते!

विशेषत: ऐश्वर्या यांचे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन अत्यंत प्रभावी होते! याचे भरभरून कौतुक स्वत: प़मुख पाहुण्या धानोरकर मॅडम यांनी केले! ऐश्वर्याच्या सहजसुंदर आणि अलंकारिक भाषा शैलीने अगदी प़ारंभापासूनच कार्यक्रमाने चढतीकमान राखली!! सौ. ऐश्वर्या यांचे अनेकांनी भरभरून कौतुक करून अभिनंदन केले!!

या कार्यक्रमाच्या आयोजन / नियोजनामध्ये मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकारिणी, विविध समित्यांचे प़मुख/ निमंत्रक सदस्य, मंडळाचे कार्यालयीन सेवक, कामगार / कर्मचारी, सुरक्षा रक्षक,श्री लक्ष्मी कॅटरर्सच्या सौ.शामल चाळके, चंद्रशेखर चाळके त्यांचे सर्व सहकारी व अन्य सर्व ज्ञात- अज्ञात सहकारी या सर्व श्रमिकांबरोबरच आमचे सन्माननीय सल्लागार यांचेही मार्गदर्शन, प़ोत्साहन यामुळे कार्यकर्त्यांना / सेवकांना श्रम जाणवलेच नाहीत.

कर्तव्याच्या भावनेने सतत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी आमच्या ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय सौ. चित्राताई धुरी, रविंद्र महाडिक आणि चंद्रकांत लाड साहेब स्वत: उपस्थित होते! हा एकूणच सोहळा अत्यंत देखणा, शिस्तबद्ध आणि वेळेच्या कमालीच्या नियोजनात पार पडला!

श्री लक्ष्मी कॅटरर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेल्या या कार्यक्रमाची एकूण सर्व खान – पान व्यवस्था, सभागृह सजावट इ. लक्षवेधी होते! मंडळाची परंपरा आणि नावलौकिक यशस्वी राखणारा हा समारंभ यशस्वी करणार्या सर्व संबंधितांबरोबरच कार्यक्रमाचे शेवटचे आभार प्रदर्शन सौ. करुणा सावंत यांनी खरोखरच अत्यंत उत्तम आणि रंजक स्वरूपात केले! आभार प्रदर्शनाला रसिकांच्या टाळ्या घेण्याचे भाग्य सौ. करुणा ताईना लाभले! हा तर दुर्मिळ योग!!