ग्राहकपेठ आणि महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन.

शनिवार दिनांक ९ मार्च ग्राहकपेठ व रविवार दिनांक १० मार्च रोजी महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठा मंडळाच्या *ग्राहकपेठ व महिला मेळावा* हा एक अविस्मरणीय कार्यक्रम झाला. ९ आणि १० मार्च रोजी दोन दिवस या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सुप्रसिद्ध निर्माती, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका संजीवनी जाधव या मेळाव्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्यावर आधारित छोटीशी नाटिका सौ.श्रध्दां सुर्वे व सौ.मनाली महाडीक यांनी सादर केले, त्याचे दिग्दर्शन उदय दरेकर यांनी केले. त्यानंतर सौ.शुभदा म्हामुणकर यांनी अभिनेत्री संजीवनी यांची खुमासदार मुलाखत घेतली. संजीवनी जाधव यांनी मुलाखतीत बर्‍याच गोष्टीचा छान उलघडा केला.बर्‍याच चांगल्या वाईट गोष्टीचे किस्से त्यांनी सांगितले.

या एकूण यशस्वी आयोजनात अनेकांचे योगदान लाभले, मी स्वत: सतत आठ/ दहा दिवस कांहींची धडपड, लगबग, परिश्रम, आणि समर्पणाची भावना अनुभवली आहे. या मध्ये प़ामुख्याने महिला आघाडी प़मुख सौ. माधुरी ताई तळेकर, सौ. ऐश्वर्या ब्रीद, सौ. मनिषा साळवी, सौ. रश्मी राणे, श्री. अजय खामकर, श्री. प़मोद देसाई, श्री. ज्ञानेश्वर भालेराव, अजय माने, हेमंत भोगले, दिगंबर राणे,या सर्वांचे सतत दररोजचे परिश्रम खरोखरच वाखाणण्यासारखे होते.या संपूर्ण आयोजनात या सर्वांबरोबरच कार्यकारिणी व अन्य समित्यांचे प़मुख, सदस्य, या सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे.

महिला मेळाव्याला अनुसरून प़वेशद्वारी सौ. प़ाजक्ता अनिकेत चव्हाण यांनी काढलेली सुंदर रांगोळी अभ्यागतांचे लक्ष वेधून घेत होती. सभागृहात रसिकांचे स्वागत, आसन व्यवस्था अत्यंत शिस्तबद्धपणे करण्यात आली होती. प़मुख पाहुण्या संजीवनी जाधव यांचे स्वागत, सन्मान इ. उत्तमच! रंगमंचावर सौ. श्रद्धा सुर्वे आणि सौ. मनाली महाडिक यांनी सादर केलेले संजीवनी जाधव यांच्या भूमिकेचे प़हसन छानच!!

सौ. सोनाली सावंत यांचे सूत्रसंचालन नेहमी प्रमाणेच श्रवणीय होते. संजीवनी जाधव यांची खुमासदार मुलाखत प़ेक्षकाना खुर्चीला खिळवून ठेवणारी ठरली! ही मुलाखत आणखी थोडी अधिक असायला हवी होती अशी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली. सौ. शुभदा म्हामूणकर
यांनी तर  संजीवनी ताईंचा एकूण जीवनपट अत्यंत खुबीदारपणे उलगडला! ही मुलाखत खरोखरच श्रवणीय आणि तितकीच संस्मरणीय झाली. सौ. माधुरी तळेकर यांचे समयोचित प़ास्ताविक.

सुप्रसिद्ध शाहिर मधुकर खामकर यांचा सन्मान यथोचित ठरला! अनेकांनी त्या बद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हा सौ. ऐश्वर्या ब्रीद यांचा शाब्दिक अविष्कार खरोखरच अप्रतिम होता!

तसेच सजावट श्री. हेमंत भोगले, व्हिडिओग्राफी दृष्टी आर्ट्सचे श्री. कृणाल शिंदे यांनी केली.तसेच कार्यक्रमासाठी प्रवेशव्दारावर सौ.प्राजक्ता चव्हाण यांनी ग्लोबल पारितोषिक मिळावे अशी वेगळीच महिलासाठीच रांगोळी काढली होती.सर्व महिलांनी आपली कामगिरी उत्तम निभावली.

या सर्व कार्यक्रमांस मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के काका यांचे मार्गदर्शन लाभले. सरचिटणीस श्री.अजय खामकर सर्व महिलांच्या पाठीशी उभे होते. पदाधिकारी-कार्यकारिणी सदस्य , सर्व सल्लागार, सल्लागार सौ.चित्रा धुरी, महिला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर,निमंत्रक सौ.मनीषा साळवी, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.रश्मी राणे,निमंत्रक करुणा सावंत, संपूर्ण महिला आघाडी, विविध समित्यांचे उत्स्फूर्त कार्यकर्ते, सहकारी सेवक वर्ग,हितचिंतक आणि हे सोहळे यशस्वी करण्यास लाभलेले प्रेक्षक यांच्यामुळेच मंडळाचे हे तिन्ही सोहळे दिमाखदार जाहले!

हा महिला मेळावा, नेत्र तपासणी शिबीर आणि ग्राहक पेठ अशा सलग दोन दिवसांचा महोत्सव म्हणजे मंडळात अत्यंत भारावलेले,
मंत्रमुग्ध करणारे वातावरण तयार झाले होते. महिला आघाडी, सांस्कृतिक समिती, ज्येष्ठ नागरिक समन्वय व आरोग्य विभाग, कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, अन् समित्यांचे कार्यकर्ते, आपले कार्यालयीन सेवक, कामगार- कर्मचारी श्री.लक्ष्मी कॅटरर्सचे सर्व सहकारी, या सर्वांचा सहभाग, सहयोग आणि परस्पर संपर्क – संवाद, आदर याचे मनोज्ञ दर्शन झाले.