*मराठा मंडळ मुलुंड आणि डिग्निटी फाउंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने *सोमवार, ९ जून २०२५ ते शुक्रवार १३ जून २०२५* पर्यंत मराठा मंडळात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या फिरत्या दवाखान्यात संधीवात, गुडघेदुखी, मानदुखी, टाचदुखी, कोपरादुखी, अर्धांगवायू, पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी यासारख्या विविध समस्यांवर उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले. *PRO भारत मोकल, फिजिओथेरपीस्ट डॉ. विशाल गुप्ता आणि डॉ. प्रियांका मोरे* यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून (उदा. आयएफटी मशीन, अल्ट्रासाऊंड मशीन, टेन्स मशीन, ट्रॅक्शन मशीन, मसल स्टिम्युलेटर) ट्रीटमेंट, एक्सरसाईज थेरपी, बॅलन्स ट्रेनिंग, फ्रॅक्चरनंतरचे व्यायाम, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ड्राय नीडलिंग थेरपी देण्यात आली, यावेळी सहभागींना फिजिओथेरपी व्यायाम पुस्तिका देण्यात आली. हे शिबिर *९ जून ते १३ जून २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात आले.
शिबीराला *उस्फुर्त* प्रतिसाद मिळाला,या फिजिओथेरपी ट्रीटमेंट शिबीराचा *११०* नागरिकांनी लाभ घेतला व *मराठा मंडळाचे आभार मानले*
*राजन भोसले*
*प्रमुख*,*ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती* व *आरोग्य विभाग*