माहुली फार्म…संस्मरणीय मराठा मंडळ महिला आघाडी स्पेशल सहल…..!

माहुली फार्म…संस्मरणीय मराठा मंडळ महिला आघाडी स्पेशल सहल…..!                                         

थकल्या भागल्या मनाची सर्व्हिसिंग करून, नको असलेले विचार बाहेर काढून, नवीन ऊर्जा तयार करण्याचे हक्काचे गॅरेज म्हणजेच मैत्री आणि मैत्रिणींसोबत मज्जा,मस्ती, फुल्ल टू धम्माल करण्याचे ठिकाण म्हणजे सहल…!
प्रपंचाच्या रहाटगाड्यातून वेगळा आनंद घेण्याची सवड – निवांत काढलेला वेळ म्हणजे सहल…!

शनिवार दि.११/०६/२०२२ रोजी, मराठा मंडळ मुलुंड,मुंबई महिला आघाडीने…मंडळाच्या सभासद महिलांसाठी… माहुली फार्म,शहापूर येथे सहल आयोजित केली होती. मंडळाच्या इतिहासातील – तब्बल ७१ महिला, असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही पहिलीच महिला स्पेशल सहल…!

मार्च मधील महिला दिनानिमित्त आयोजित “आम्ही उद्योगिनी” या ग्राहक पेठेच्या यशस्वी पाऊलामागून टाकलेले हे पुढचे सहलीचे पाऊलही अत्यंत यशस्वी ठरले…..!

                     

सकाळी सर्व महिलांना शुभेच्छा देण्यासाठी मंडळाचे सेक्रेटरी मा. अजयजी खामकर,मा.वसंतजी भोसले,मा.राजनजी भोसले,मा.रमेशजी शिंदे,मा.ज्ञानेश्वरजी भालेराव मा.अजयजी माने,उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष मा.रमेशजी शिर्के काका, सेक्रेटरी,मा.अजयजी खामकर, मा. कार्याध्यक्ष महेशजी चव्हाण, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य,ह्या सर्वांचे मार्गदर्शन, पाठिंबा, सदोदित असतो. बसची व्यवस्था समन्वय समिती सदस्य राजनजी भोसले यांनी केली.  

महिलांसाठी सहल जाहीर केली आणि सर्वांत जास्त उत्साह कोणामध्ये संचारला असेल तर वयाने ज्येष्ठ परंतु मनाने तरुण असणाऱ्या मैत्रिणींमध्ये. सहलीला येणाऱ्यांच्या उत्फुर्त प्रतिसादासोबत आयोजकांचाही आत्मविश्वास वाढत होता. सहलीची जोमदार तयारी सुरू झाली. व्हॉटसॲप मेसेजेस, सहलीचे ठिकाण निश्चित करणे,तेथे भेट देऊन व्यवस्था पाहणे,मेन्यू ठरवणे,सहलीचे पैसे रोजच्या रोज कार्यालयातून जमा करणे, सहलीच्या व्हॉटसॲप ग्रुप वर वेळोवेळी सूचना देणे, खेळ आयोजित करणे, खेळाचे सामान,बक्षिसे,भेटवस्तू यांची खरेदी करणे, म्युझीक सिस्टीम व्यवस्था, यांसारखी अनेक कामे प्रमुख सौ.माधुरी तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समिती सदस्य स्वतः करत होते. यातून समितीतील एकजूट अजून भक्कम झाली.

सर्व कार्यकर्त्या आणि सहलकरणींचा उत्साह ऊतू जात होता आणि तो दिवस उजाडला. दिलेल्या वेळेआधीच सकाळी सगळ्याजणी मंडळात हजर. नेहमीच्या पारंपारिक पोषखापेक्षा वेगळ्या वेशभूषेत सर्वजणी भारी दिसत होत्या.
मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून ,बाप्पा मोरया चा गजर करत दोन्ही बसेसनी शहापूर कडे वेग घेतला आणि सुरू झाला फक्त आणि फक्त धुमाकूळ…! सुरुवात आरत्यांनी… व्हाया कोळी डान्स करून द एंड अर्थातच सैराट धुमशान..! 

“माहुली फार्म”…सुंदर निसर्गरम्य ठिकाण. माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी. पावसाने दगा दिल्याने धबधबा अनुभवता आला नाही. रायवळ,हापूस, केसर आंब्याची राई, फणस, चिकू सारखी अनेक झाडे, करवंदाच्या जाळ्या, शेत तळं, गाई गुरांचे हंबरण्याचे आवाज, सारवलेलं मोठ्ठं अंगण… सारवलेल्या अंगणात पाऊल ठेवले आणि त्या थंडगार जमिनीवर गालीच्याचे सुख मिळाले. आपल्याच कोकणातील गावात आल्याचा फिल आला. उत्कृष्ट नाष्टा,स्वादिष्ट शाकाहारी – मांसाहारी जेवण. पोटासोबत मनही तृप्त झाले. सर्व मैत्रीणीना सामावून घेणारे मजेशीर खेळ आयोजित केल्याने सर्वजणी वय विसरून मनसोक्त खेळल्या.

                           

जिंकल्यानंतरचा गगनात न मावणारा आनंद जणूकाही ऑलिंपिक पदक जिंकल्याचा!! तेथील तरण तलावात मनसोक्त डुंबून पोहण्याचा आनंद घेतला.जेवणाच्या आधी डान्स मध्ये गॉगल लावून दिलखुलास नाचताना आनंदाला उधाण आले होते.

                                                                   

सत्तरी पार केलेल्या २१ मैत्रिणींचा, सुंदर भेटवस्तू देऊन केलेला सन्मानाने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूंनी दाटी केली होती. सर्व सहभागी मैत्रिणींना छान भेटवस्तू दिल्या.याबद्दल सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले.

नंतर सर्वांना, महिलांची पहिलीच मोठी सहल निमित्ताने भेट वस्तू देण्यात आल्या.महिलांना प्रत्येकी २००/- रू. परत देण्यात आले. माहुली फार्मची व्यवस्था अतिशय उत्तम होती. 

अतिशय आनंदात दिवस कधी संपला कळलच नाही. ह्या सर्वांत निमंत्रक सौ. मनिषा साळवी, सल्लागार चित्रा धुरी, सांस्कृतिक समिती प्रमुख सौ.रश्मी राणे, कार्यकारिणी सदस्य सौ. ऐश्वर्या ब्रीद. समिती सदस्य सोनाली सावंत, यां सर्वांचा सहभाग आणि महिला आघाडी सर्व सदस्य ह्या सर्वांची मदत होतीच.प्रत्येक वेळी मिटींगला आर्वजून उपस्थित असतात. दिलेली आपापली कामे अतिशय चोख करतात.त्यांचा सहभाग मोठा आहे. ह्या सर्वांनी खूप मेहनत घेतली.सर्व मैत्रिणींचे मनापासून आभार. तसेच आपला सगळा ऑफीस स्टाप जानव्ही खामकर,श्रावणी हांदे, श्री गुरूनाथ खामकर.आणि काबंळे,परब,आणि गणेश,ह्या सर्वांची मेहनत आहेच. त्यामुळेच,आपली सहल अतिशय सुदंर झाली. 

संध्याकाळ कधी झाली कळलेच नाही. तिथून पाय काढणं जड जात होतं. चहा,कॉफी,भजी, बिस्किटे यांचा आस्वाद घेऊन…संस्मरणीय आठवणी मनात साठवून ….पुढील सहलीची योजना आखत जड पावलांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. दिवसभर भटकून,डुंबून,खेळून,नाचूनही न थकलेल्या मैत्रिणी, परतीच्या प्रवासातही धम्माल करत घराकडे परतल्या.

या पहिल्या महिला स्पेशल सहलीच्या संस्मरणीय आठवणी हृदयाच्या एका गोड कप्प्यात कायम कोरलेल्या राहतील!

———————————————————————————————————————-

सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या काही निवडक बोलक्या प्रतिक्रिया :

नमस्कार, 

माधुरी ताई, चित्रा ताई,रश्मीताई,मनीषा ताई,मीनल ताई,सोनाली,ऐश्वर्या,शामल,आणि सायली ताई,खूप खूप धन्यवाद.

खरंच आज एक स्त्री काय करू शकते याचा छान अनुभव आला. नुसत पद घेऊन उपयोग नसतो,तर त्या साठी लागणारे नेतृत्व,कर्तृत्व,आणि झपाटले पण असावं लागत,छोट्याश्या गोंधळात सुद्धा सावधानतेने मार्ग काढावा लागतो.त्याचाही खूप छान प्रत्यय आला.

योजलेले कार्य अत्यंत सुरेख,नियोजन बद्ध, पार पडेपर्यंत ची जबाबदारी उत्तम रित्या पार पाडली.ज्येष्ठां बरोबरच इतरांची ही काळजी विचारपूस अत्यंत प्रेमपूर्वक.म्हणूनच असे कार्य उत्तम रित्या पार पडते.आणि मंडळाचा विकास घडतो. आपल्यासारख्या मैत्रिणी मिळाल्या चा आनंद वाटतो. सहलीचा आनंदानुभव खूप हुरूप दायी.  मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा….!     

विनिता दरेकर 

———————————————————————————————————————-

सिनियर सिटीजनचे महिला आघाडीने भेट वस्तू देऊन छान कौतुक केले आभारी आहोत 🌹🌹👌👌👍🏻👍🏻

शोभा सावंत

———————————————————————————————————————-

पिकनिक खूपच धमाल , मस्त झाली. सगळे फोटो छान . माधुरी ताई आणि त्यांच्या टीमच्या मेहनतीला सलाम.

पिकनिकचे सगळे फोटो छान धमाल मस्ती केली आम्ही त्यांच्या मेहनतीला आणि उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन बद्दल धन्यवाद👌👌

वंदना लोटणकर


नमस्कार 🙏

‌महिला ‌आघाडी प्रमुख सौ माधुरी तळेकर टीमने सहलीचे आयोजन, नियोजन मराठा मंडला शोभेल असे केले. आपण सर्वानी दिलेल्या प्रतिक्रियामुळे खरंच आमच्या महिला आघाडीला सोनालीने म्हटल्याप्रमाणे ऊर्जा मिळेल. आपल्या महिला मंडला तील महिलांची संख्या कले‌ कलेने वाढते हे पाहून खूप समाधान वाटते. अशीच आमची महिला आघाडी आपल्या ‌समोर‌ नवीन नवीन‌ उपक्रम घेऊन येईल. आपल्याला enjoy करायची‌ संधी देईल. पुढच्या उपक्रमास शुभेच्छा🙏

चित्रा धुरी

———————————————————————————————————————-

पिकनिकला खूप मज्जा आली. नविन मेंबर्सला तुम्ही छान सामावून घेतले.

सीमा घोसाळकर


नमस्कार..!

आपली महिला स्पेशल सहल आपल्या महिला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर यांनी अहोरात्र झपाट्याने आयोजन केले होते.जेव्हा शीलेदार अशी कामं करतात तेव्हा च असे कार्यक्रम यशस्वी होतात. त्यांचे आम्ही साथीदार त्यांच्या बरोबर काम करत होतो. ऐश्वर्या,सोनली,सोनल यांनी तर क्राॅफोट माक्रेट ला जाऊन बक्षिसे आणली, सर्व आर्थिक बाजू सौ.मनिषा साळवी, जान्हवी,गुरूनाथ खामकर यांनी प्रमुखांना मदत केली. आपल्या सल्लागार सौ.चित्रा धुरी यांनी आपल्या महिला मंडळाची स्थापना कशी झाली याचा इतिहास सांगितला.त्यामुळे नवीन महिलांना माहिती मिळाली.
विशेष म्हणजे आपल्या जेष्ठ महिलांनी सहीलीचा आनंद मनसोक्त घेतला.त्यातच आम्हाला कष्टाचे चीज झाले असे वाटत. यापुढे ही असेच सर्व महिलांनी सहकार्य करावे. परत एकदा महिला प्रमुख यांनी आयोजन, नियोजन उत्कृष्ठ केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन 💐

आशा राणे

———————————————————————————————————————

पिकनिकला गेल्यामुळे वय विसरून मनमुराद मज्जाच मज्जा करता आली. लक्षणीय पिकनिक स्पॉट अतिशय सुंदर असल्यामुळे सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला मिळाला. सगळ्यानां गिफ्ट देऊन माधुरी मॅडमच्या महिला आघाडीने सगळ्या महिलांची मने जिंकली असल्यामुळे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक 🙏🙏🙏💐💐

परिश्रमपूर्वक सहल आयोजित करणार्‍या आमच्या आवडत्या मैत्रिणीचे खुप खुप कौतुक आणि अभिनंदन. 🙏👍👍
पुढील चांगले चांगले उपक्रम आयोजित करण्यासाठी ढीगभर शुभेच्छा 👍👍👍

स्मिता पवार

———————————————————————————————————————-

रिटर्न गिफ्ट देऊन, हिशेब करुन आयोजकांनी दोनशे रुपये परत केले ही देखील मोठी गोष्ट आहे.

सीमा ताई म्हणाल्या प्रमाणे आम्हा पहिल्याने येणार्‍यांना पण सर्वांनी छान सामावून घेतलंत 🙏🙏

नंदिनी गावडे

———————————————————————————————————————-

हि सहल आयुष्यात कधीही विसरु शकत नाही सहलीवरुन आल्या पासून, रात्रंदिवस सहलच सर्व मैत्रीणी ती धमाल नाच गाणी हा चित्रपट डोळ्यासमोर दिसत असतो फोटो किती वेळा पाहिले तरी समाधान होत नाही 🙏🏼🙏🏼👍👍👍👍

शिल्पा लाड

———————————————————————————————————————-

मला आणि प्रतिक्षा शिंदे यांना ही खूप खूप मज्जा आली आम्हाला असे वाटलेच नाही की पहिल्यादा आपली सगळ्यांची भेट झाली आहे खुप आनंद झाला सगळ्याचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻

सरला निरगुडे


सर्व भाषणं व सुत्रसंचालन मस्तच!! गिप्ट सुंदर!!सर्व टिमचे व सहलीसाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे खूप खूप आभार !!🙏🌹 आम्ही सर्वांनी खूप मज्जा केली. आठवणीत राहिल अशी सहल!!👌

नयनतारा भालेराव


सहलीचा एक वेगळा पण अतिशय सुखकर आणि आनंददायक अनुभव आणि सर्व महिलांना बक्षीस देण्याची कल्पना आवडली सर्व आयोजकांना धन्यवाद.

शैला नलावडे

———————————————————————————————————————-

आम्हा सख्याना अद्भुत आनंद निसर्गाच्या सांनिद्यात ही पावसाळी सहलंम्हणजे आनंदाची पर्वणी आघाडी प्रमुख मधुरिताई चित्रा रश्मीताई ऐश्वर्या सोनाली आणि त्यांच्या मदतनीस या सर्वांचे उत्तम नियोजन मेहनत आणि सहकार्य याचे हे फलित आहे आदरणीय अध्यक्ष शिर्के काका आणि त्यांच्या कार्यकारिणीची साथ मार्गदर्शन यामुळे आमची सहल संस्मरणीय झाली सर्वांना धन्यवाद

विभावरी भोसले

———————————————————————————————————————-

Gift for Senior citizens is very beautiful and special. Selection is very thoughtful too. Thanks a lot to Madhuri Madam and her helpful team Wish you and your team all the best.

मुग्धा राणे

———————————————————————————————————————-

कालची पिकनिक खूप छान आयोजित केली होती. वेळेचे नियोजन व जेवणाची व्यवस्था उत्तम होती. खूप मज्जा आली. माधुरी तळेकर आणि टीम चे अभिनंदन.

प्रतीक्षा प्रभाकर मोरे

———————————————————————————————————————-

पिकनिकला वय विसरून खूप मज्जा केली पिकनिक स्पॉट सुंदर आयोजन उत्तम जेवण नाश्ता खूपच उत्कृष्ट आणि टीमचे भरभरून कौतुक धन्यवाद👌🙏

वंदना लोटणकर

———————————————————————————————————————-

हृदयापासून सर्वांना धन्यवाद 🙏. खूप वर्षाने मी नाचण्याचा, पोहण्याचा आनंद उपभोगला. मनसोक्त नाचून घेतले 💃. मीच नाहीतर सर्वांनी ह्याचा आनंद लुटला. याचे श्रेय मराठा मंडळ मधील सर्व मान्यवर अणि आपल्या मैत्रिणींना 👍🥰.

सायली सत्यवान दळवी

———————————————————————————————————————-

कसली मज्जा केली आपण एकदम एन्जॉय 💃🏿💃🏿💃🏿 धम्माल कसलीच कसर सोडली नाही. आयोजकांना धन्यवाद 🌹🌹मनसोक्त आनंद घेतला. मज्जा आली. खूप साऱ्या आठवणी कायम राहतील 😄 नवीन, नवीन मैत्रीणनींची ओळख झाली. आपल्या सख्या परिवार वाढला. एकदम झक्कास 😄👍

सुचिता दळवी

———————————————————————————————————————-

खूप मज्जा आली आपण सगळे फ्रेश झालो.अगदी आठवणीत राहील कालचा दिवस.🤗😍
ज्योती दळवी

———————————————————————————————————————-

पिकनिक खूपच धमाल , मस्त झाली. सगळे फोटो छान . माधुरी ताई आणि त्यांच्या टीमच्या मेहनतीला सलाम 👏

प्राची पालव.

———————————————————————————————————————-

एक उनाड दुपार…..!

एक उनाड दुपार मस्त मस्त गेली,
मराठा मंडळाने आमच्या सहलीचे सोय खूपच स्वस्त केली.

बस मध्ये गाणी डान्स उखाणे यांचा पडला पाऊस,
तरुण आणि वयस्का नी भागवून घेतली हौस.

गप्पागोष्टी च्या नादात माऊली कधी आली नाही कळले,
निसर्गाचे सौंदर्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले.

दंगा मस्तीने, थकलेल्यांची क्षुधा भागवली पोटभरीचा नास्ट्या ने,
परत आली ऊर्जा, मग आनंद घेतला पाण्यात पोहण्याने.

सर्वदूर हिरवळ पाहून संख्यांची मने हिरवळली,
वेगवेगळ्या खेळातील गमतीजमतीनी सख्यांची हसून हसून मुरकुंडी वळली.

खेळ खेळून दमल्यावर पाडला फडशा जेवणाचा,
सर्वांनी आनंद घेतला स्वादिष्ट पदार्थांचा.

मंडळाच्या कार्यकारिणीने सर्वांच्या इच्छा प्रेमाने सांभाळल्या.
इतक्या भाऊक झाल्या सर्वजणी, की सख्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

आठवण राहील निघताना झालेल्या जड पावलांची,
वाट पाहू सख्यानो आता पुढील वर्षी निघणाऱ्या सहलीची

चित्रलेखा शिंदे

 

 



1 Comment

Leave a Reply