माझी अमेरीका वारी

भटकंतीच्या निमित्ताने भारतात छोटे छोटे प्रवास झाले .पण वयाच्या सत्तराव्या वर्षी अमेरीकेचा लांबचा प्रवास होईल अस वाटल नव्हत. माझा मुलगा चि.अतुल सूनबाई प्रभा अमेरीकेत बोस्टनला स्थायिक झाली .पणजेव्हा नातवंड तिकडे शाळेसाठी स्थायिक झाली.तेव्हा मात्र मनाची घालमेल सुरू झाली आणि लगेचच तशी संधी मिळाली.मुलाने तिकीट पाठवल.पासपोर्ट व्हीसा तयार होताच.फक्त मनात विचार होता एवढा लांबचा प्रवास जमेल का? पण जाण्याच्या इच्छाशक्तीपुढे सर्व सुरळीत झाल.

अठरा तासाचा प्रवास झाला आणि बोस्टन च्या विमानतळावर बाहेर आले.प्रथम धरणी मातेला नमस्कार केला धन्य वाटल घरी गेल्यावर .एक ना दोन तीन महिने कसे गेले कळल नाही. पण त्यात सॅक्रीमेंटोमधली भाची डाॅक्टर पूनम कॅलिफोर्नियात भाची नम्रता बळेच घेऊन गेली .त्यानंतर न्यूयॉर्क पुतण्या डाॅक्टर योगेश तीथे अप्रतिम अमेरीकेतील समुद्रतील स्वतंत्र देवतचा पुतळा पाहिला.त्यावेळी मनात एक विचार सतावू लागला माझा शिवाजीमहाराजंचा असाच समुद्रात पुतळा असावा ज्याला पहायला सर्व जगातील लोक येतील .आणि न्यूयॉर्क मधूनच माझा भाचा पंकज सूनबाई न्यूमेक्सीकोत बलून फेस्टीवल बघायला घेऊन गेले.

1ऑक्टोबर ते13 ऑक्टोबर त्यात नवरात्रोत्सव .किती आनंदाचा देवी दर्शनाचा सोहळा पहावा .पण 13तारखेला उघड्या मैदानावर पहाटेतीन वाजता फुग्यांचा सण (खेळ) पहायलागेली.त्याच वर्णन करताना शब्द अपुरे पडतील .संपूर्ण मैदान वेगवेगळ्या आकाराच्या देशाच्या फूग्यानी भरल होत अमेरीकेचा ध्वज असलेला फुगा पहिलाहोता आकाशात दिव्यांच्या झगमगाट क्षणभर भास होत होता आकाशातील तारका भूतलावर आल्यात का? मला अमेरीकेचा ध्वज असलेल्या फुग्याकडे सूनबाईने नेल जेव्हा तो फुगा हवेत उडायची वेळ झाली तेव्हा त्याध्वजाला पकडायला सांगितल. तिथली प्रार्थना लहानमोठी सगळी म्हणत होती मी मात्र झेंडा पकडून गायत्रीमंत्र म्हणत होते.खुप भाग्याच असत म्हणे ते.1,2,3म्हणून फुगा हवेत उडायच्या आत काही माणस फुग्यात बसलेली होती.फुगा हवेत उडाला एवढ्यात माझा बाजूला उभी असलेली एक आई माझा मुलगा या फुग्यात बसलाय म्हणून रडू लागली मला जवळ जवळ तीने मिठी मारली.आणि म्हणू लागली मी मुलाला जाऊ नको सांगत होती माझा एकुलता एक मुलगा आहे.

ती अमेरीकन इंग्रजीत मी भारतीय इंग्रजीत तीला समजावल .पण कोण जाणे तीला माझा आधार वाटला तीला मी सांगितल मी भारतीय आहे हे सगळ प्रथमच बघते आहे.ती म्हणाली तुम्ही खुप भाग्यवान आहात आमच्या झेंड्याला हात लावायची संधी मिळाली. मलामाझ दु:ख सांगायची इच्छा झाली .आणि तीने तीच्या जवळच कार्ड मला दिल.जणूकाही आपले नात्यातील .परमेश्वरी इच्छे पुढे काय बोलावे कोण कधी कस भेटेल जे मनाच्याअंरंगात घर करून राहील कायमच हे ऋणानुबंध आहेत.

बघता बघता सगळे फुगे आकाशात फिरू लागले त्या दिव्याच्या लखलखाटात त्या मातेचा चेहरा मी शोधत होते एका हातात तीने दिलेल कार्ड धरून. “ती माता भेटली केवळ आठवणीच कार्ड माझा हाती देण्यासाठीच…….. !

सौ. अंजली पार्टे



Leave a Reply