- June 22, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
अरे अरे पावसा तू असा रे कसा
कधी यायचं आहे हे विसरलास जसा
दिवस वार वेळ काही ठरवलंस नाही
येण्याची फारच केलीस घाई
शाळेतच गेला नाहीस
की सुट्टीचा महिना विसरलास बाई
आंबे फणस पिकायच्या आधी
धावत आलास मधल्या मधी
तयार पिकांचा केलास नाश
पाण्या चिखलाची केलीस रास
अरे तुझ्या येण्याची
तयारी करायची होती जोरात
पण तू गडबड करून
भिजून टाकलीस लग्न नी वरात
भरली धरणे नदी नाले
समुद्राला आले उधाण
शीतल रिमझिम सुख नाही
सारं कसं झालं भयाण
सैरभैर झाल्यासारखा वागू नकोस वेड्यासारखा
साऱ्यांना तू हवा असतोस जन्मदात्या बापासारखा.
सौ मिनल सावंत.
मुलुंड मुंबई
