१२७ वी आचार्य अत्रे जयंती

आचार्य अत्रे हे विडंबनकार, हे कवी, राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, कादंबरीकार, नाटककार, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. मराठी रंगभूमीला उतरती कळा लागली, त्यावेळी तिला सावरण्याचे आणि पुनश्च प्रेक्षकांमध्ये रस निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले,’ असे गौरवोद्गार साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.

आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती, मुलुंड आणि ‘आत्रेय’ सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त मराठा मंडळ मुलुंड पूर्व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. भारती निरगुडकर, मराठा मंडळाचे अध्यक्ष  रमेश शिर्के, कार्याध्यक्ष महेश चव्हाण, येथे आयोजित महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर वझे, कार्याध्यक्ष श्री. अरूण भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांक विजेती आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालयाची गायत्री देसले हिला आचार्य अत्रे करंडक प्रदान करण्यात आला. मराठी भाषेत चांगले गुण मिळविलेल्या पारितोषिक देण्यात आले. विद्याथ्र्यांनाही डॉ. सदानंद मोरे म्हणाले. ‘महाराष्ट्राबद्दलची अत्रे यांची सजगता आणि प्रेम अद्वितीय होते. त्यांच्या लेखनातून, नाटकातून आणि सार्वजनिक जीवनातून हे सातत्याने दिसून आले. पहिल्यांदा लेखक म्हणून माझे घडणे अत्रेंमुळेच झाले. मी त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या स्वभावाचा नमुना म्हणून पाहतो. मला अत्रे हे आदर्श मराठी माणूस वाटले.’ डॉ. मोरे यांनी आचार्य अत्रे यांच्या कायांचा जीवनपट उलगडत, त्याच्या कर्तृत्वाचा सखोल आढावा घेतला.

मराठी साहित्य, पत्रकारिता, राजकारण – आणि रंगभूमी यांमध्ये अत्रे यांचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. अमोल पवार यांनी वक्तृत्व स्पर्धेचा आढावा घेतला, तर महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगंधरा वळसंगकर यांनी केले.