सामाजिक जाणीव – संगोपिता केअर अ‍ॅण्ड शेल्टर या सेवाभावी संस्थेला मराठा मंडळाची भेट.

रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी *संगोपिता केअर अ‍ॅण्ड शेल्टर* येथे घालवलेला दिवस अविस्मरणीय ठरला. आश्रमातील हृदयस्पर्शी वातावरण, तेथील दिव्यांग आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे क्षण हे सर्व अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे.

या उपक्रमात आम्ही २२ जण सहभागी झालो आणि सर्वांच्या पाठिंब्यामुळे जीवनावश्यक साहित्य आश्रमाला देण्याचे सेवा कार्य आम्हाला साध्य झाले. यावेळी मंडळाच्या सुमारे २२/२३ महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन फार थोडा वेळ कां होईना परंतु तेथील सुमारे ६०/६२ दिव्यांगांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण केले! हे खरोखरच प़शंसनिय व अभिनंदनीय काम या सर्व मंडळीनी केले आहे!

या संगोपिता संस्थेचे अत्यंत हृदयस्पर्शी कार्य गेली सुमारे २२ वर्षे अव्याहतपणे चालू आहे! या संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री. सुगवेकर सर यांनी या संस्थेची स्थापना करण्याची संकल्पना विषद केली ते ऐकताना डोळे पाणावले! या सुगवेकर उभयतांनी स्वत:च्या अनुभवातून आणि आलेल्या अत्यंत कठीण व खडतर परिस्थितीतून हा संगोपिता प़पंच उभारला आहे! खरोखरच समाजामध्ये अशी सेवाभावी आणि कर्तव्यतत्पर माणसे म्हणजे दिव्यत्वाची प़चिती आहे!

आपल्या मंडळाने श्री. संचित सुधीर शिर्के, चंद्रशेखर मा. चाळके यांच्या सारख्या अनेक सहृदय देणगीदांकडून आर्थिक सहकार्य मिळवून सुमारे लाखभर रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे जीवनावश्यक साहित्य या संगोपिता संस्थेला देऊन फार मोठे मानवतावादी कार्य केले आहे!! सुवर्ण महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या आपल्या मराठा मंडळाच्या कार्यामध्ये हा एक सन्मानाचा तुरा लाभला आहे!

* मा. सरचिटणीस श्री. अजय खामकर यांनी मुलांसाठी बेडशीट्स, खाऊ, हाऊसकीपिंग साहित्य तसेच शिलाई मशीनची व्यवस्था केली.
* मा. कोषाध्यक्ष वसंत भोसले यांनी अपना बाजारमधून खाऊ व किराणा सामग्रीची जबाबदारी सांभाळली.
* कार्यकारिणी सदस्य श्री. प्रमोद देसाई यांनी Voltas वॉटर प्युरिफायर व कुलर उपलब्ध करून दिला.
* Bluetooth speaker आणण्यासाठी अजय खामकर यांना हेमंत भोगले यांनी सहकार्य केले.
* कार्यकारिणी सदस्य श्री.राजन भोसले यांनी बसची व्यवस्था पाहिली.
* कोषाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर भालेराव यांनी आर्थिक कामकाजात महत्त्वपूर्ण मदत केली.
* मंडळाचे कार्यालयीन कर्मचारी, तसेच श्री. मनोहर कांबळे यांनी विशेष परिश्रम घेऊन संपूर्ण उपक्रमात मोलाची साथ दिली.
* प्रमिला सावंत आणि इंदिरा देशमुख यांनी साड्यांचे योगदान दिले.

कलाकार हेमंत भोगले, कार्यकारिणी सदस्य अजय माने, विजय सुर्वे, श्रद्धा सुर्वे, संगीता लाड,ऐश्वर्या ब्रिद यांनी दिव्यांग मुलांसोबत गीत-संगीत व नृत्य करून त्यांच्या आनंदात भर घातली.

मा. अध्यक्ष रमेश शिर्के काका यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंडळाच्या महिला आघाडीने राबवलेला उपक्रम अधिक परिणामकारक झाला. सरचिटणीस अजय खामकर, सहचिटणीस ऐश्वर्या ब्रीद व सांस्कृतिक विभाग प्रमुख रश्मी राणे यांच्या विशेष सहकार्यामुळे हा उपक्रम सुलभतेने पूर्ण करता आला.

या संपूर्ण उपक्रमाला मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, दोन्ही उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांचा उत्साहवर्धक पाठिंबा लाभला.

महिला आघाडी प्रमुख म्हणून मी – माधुरी तळेकर आणि निमंत्रक मनीषा साळवी, आमच्या सर्व समिती सदस्यांसह हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवू शकलो, याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.

या सेवाभावी कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व मान्यवर, देणगीदार, कार्यकर्ते आणि कलाकारांचे मनःपूर्वक आभार.