महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांवर आधारित डॉ. संगीता रावदेव यांच्या श्रवणीय व्याख्यान

मंगळावर दिनांक १३ मे २०२५ रोजी आपल्या मराठा मंडळाच्या व फोर्टिस हाॅस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित प़ामुख्याने महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांवर आधारित डॉ. संगीता रावदेव यांच्या श्रवणीय व्याख्यानाचा उत्तम वृत्तांत, त्याचे शब्दांकन यामुळे सदर कार्यक्रम नजरेसमोर उभा राहिला!

 मंडळाने आरोग्य विषयक खरोखरच अप्रतिम कार्यक्रम सादर केला. मंडळाच्या *ज्येष्ठ नागरिक समन्वय व आरोग्य विभाग* या समितीचे प्रमुख मा. श्री. राजन भोसले, त्यांचे सर्व समीती सदस्य, कार्यकारिणी,फोर्टिस हाॅस्पिटलचे श्री.जसिम खान,निवेदिका सौ. सोनाली सावंत यांचे निवेदन, सौ. ऐश्वर्या ब्रीद यांचे समयोचित आभार प्रदर्शन,अत्यंत शिस्तबद्ध, सुनियोजित आयोजन यामुळे हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला! मुलुंडकर महिलांचा प़तिसाद लक्षणीय होता.

कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य यांची संघशक्ती, परस्पर समन्वय, सहकार्य यामुळे मंडळाने आयोजित केलेले सर्वच कार्यक्रम उत्तम होतात याचेच हेही एक उदाहरण.