- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ, मुलुंड यांच्या वतीने आयोजित “गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांसाठी कार्यशाळा” या विशेष उपक्रमात, पुनर्विकास, स्वयंविकास आणि संपूर्ण प्रक्रिया याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहकार क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ Advocate श्रीप्रसाद परब यांनी कायदेशीर बाबी,
विकासकांशी होणारे वाद कसे टाळावेत, तसेच प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ कशी ठेवावी यावर मार्गदर्शन केले.
त्यांच्या सहज शैलीत त्यांनी उपस्थितांच्या अनेक शंका दूर केल्या. या उपक्रमामागे ज्येष्ठ पत्रकार व मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री. कुमार कदम यांची संकल्पना होती. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. या कार्यशाळेला डॉ.अगरवाल आय हॉस्पिटल, सारस्वत बँक आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग उपस्थित होता. प्रश्नोत्तरांच्या सत्रामुळे संवाद अधिक सखोल झाला.
मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सल्लागार यांच्या समन्वयामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.