येरे घना…येरे घना

मराठा मंडळ मुलुंड अंतर्गत सरस्वती वाचनालय मुलुंड आयोजित “येरे घना…येरे घना..हा पावसाच्या कविता  व गाणी”हा कार्यक्रम अत्यंत अद्वितीय, अविस्मरणीय व अप्रतिम झाला.या कार्यक्रमाचे सूत्रधार जेष्ठ कवी आद.अरुण म्हात्रे यांनी सुरूवातीपासूनच आपल्या अमृत वाणीने श्रोत्यांचा ताबा घेतला तो शेवटपर्यंत. त्यांनी जेष्ठ आणि श्रेष्ठ कवी बा.भ बोरकर,ना.धो, महानोर, पाडगावकर,नायगावकर,नलेश पाटील इ.अनेक कवींच्या निवडक कविता, त्यांच्या आठवणी, विनोदी किस्से एकातून एक असे गुंफून इतके रंगतदार पणे.बहारदारपणे  सादरीकरण केले की श्रोत्यांची ” ऐकता किती ऐकशील दो श्रवणे अशीच अवस्था झाली.धो धो पाऊस बरसावा तशा पावसाच्या कविता त्यांच्या मुखातून सहजपणे बरसत होत्या.सरीवर सरीच .यावेळी वाद्यवृंदांची साथ असल्याने त्यांची गायकीही अनुभवता आली.अफलातूनखचाखच भरलेल्या सभागृहातील श्रोते मंत्रमुग्ध होऊन दाद देत होते.त्यांच्या सहकारी कवी/गायक वाद्यवृन्द यांनीही तेवढीच तोलामोलाची साथ दिली.त्यांची कन्या अभिनेत्री ऋग्वेदीने आला पाऊस पाहूणा या कवितेतील कल्पनाचित्र हुबेहूब उभे केले. कवी संदीप राऊत यांच्या ‘जळे ऊन्हात भिजून माय वेचितसे दाणा’ या कवितेतील कारुण्य  त्यांच्या कवितागायनातून जिव्हारी भिडले तसेच स्मुग्धा माळी यांच्या ‘ नको नको रे पावसा’ या कवितेनेही स्मुग्धा आणि साईशा यांनी श्रोत्यांच्या कायमची मनातली केतकीच्या बनी,झिम झिम झरती ,नाच रे मोरा इ . अनेक मराठी व रिमझिम गिरे सावन , नैना बरसे सारखी अनेक हिंदी गीतेही उत्कृष्ट वाद्यवृंदाचअप्रतिम सादर केली.त्यामुळे सर्वजण मनोमन  पावसात चिंब भिजून  आनंदाने डोलत होते.ही अनोखी बहारदार मैफल उत्तरोत्तर खूप रंगत गेली व अप्रतिम अशा घन घन माला या गीताने त्याची सांगाता करत  खूप उच्च प्रतीचा आनंद देऊन गेली. अशाप्रकारच्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मराठा मंडळाचे सन्मा.अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य यांचे खूप खूप आभार  तसेच सरस्वती वाचनालय मंडळ प्रमुख सौ. मीनल सावंत व इतर सदस्य यांची मेहनत व नियोजन वाखाणण्याजोगे  प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उत्तम प्रकारे पार पाडला